Site icon e लोकहित | Marathi News

Pune Crime । पुणे हादरलं, पोलीस अधिकाऱ्यानेच केली पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या; स्वतःचेही संपवलं जीवन

Pune shaken, wife and nephew shot dead by police officer; Ended his own life

Pune Crime । पुणे : पती आणि पत्नीमध्ये सतत वाद होत असतात. परंतु कधी कधी हेच वाद विकोपाला जातात आणि मोठा अनर्थ होतो. असाच काहीसा प्रकार पुणे (Pune) शहरात घडला आहे. पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने (Police officer) आपल्या पत्नीची आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Fertilizer Seeds Complaints । बोगस बियाणे आणि खतांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक जारी, आता 24 तास सुरु राहील सेवा

भारत गायकवाड असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात राहत होते. त्यांनी मध्यरात्री चार वाजण्याच्या दरम्यान पत्नी मोनी गायकवाड (वय 44 वर्ष) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय 35 वर्ष) यांची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतः देखील आत्महत्या केली आहे. (Latest Crime News)

Ajit Pawar | “शरद पवारांनी मला राजकारण शिकवले नाही,” अजितदादांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट

या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आधी हत्या आणि नंतर आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. परंतु या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.

Tomato Price। टॉमॅटो महाग वाटत असतील तर खाऊ नका, भाजप मंत्र्याच्या अजब सल्ल्याने खळबळ

Spread the love
Exit mobile version