राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत होत्या. यामध्येच आता त्यांच्या या वक्तव्यामुळे आज पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
RRR ला ऑस्कर मिळणार? गोल्डन ग्लोबच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत एस.एस.राजामौलीचा चित्रपट!
यावेळी भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. कारण की मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातात. त्यामुळे अनेकदा गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे आज पुणेबंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, यासाठी या मोर्च्यात छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे महाराज, अजितदादा पवार, सुषमा अंधारे आदी नेते आज पुणे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत.