कायदे अंमलबजावणीत आणण्यासाठी ट्राफिक पोलिसांची निवड केली जाते. यामध्ये ट्राफिक पोलीस 24 तास म्हटलं तरी ड्युटी निभवण्याचं काम करत असतात. आणि त्यामुळेच तुमच्या आमच्या लोकांचा त्यांवर पूर्णपणे विश्वास असतो. परंतु पुण्यामध्ये अशी काही घटना घडली आहे की पोलीस हवालदार लाज घेताना कॅमेरा मध्ये कैद झाले आहेत.
Devedra Fadanvis | शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावरून देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी, म्हणाले…
पुण्यातील ट्राफिक पोलिसांचा एक सोशल मीडियावरती लाज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये ते पोलीस दुचाकीस्वाराकडून लाच घेताना आढळून आले आहेत. आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे दोन ट्राफिक पोलिसांना निलंबित करण्यात आल आहे. दुचाकीस्वरावर कायदेशीर कारवाई न करता लाच घेतल्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त विजयकुमार मगर यांनी ही कारवाई केली आहे. बऱ्याचदा वाहतूक थांबवून पोलीस कर्मचारी लाच घेताना आढळून आल्याचे व्हिडिओ समोर येतात. परंतु पुण्यातील कर्मचारी निलंबित करून लोकांच्या मनामधील भीती काढून टाकली आहे.