Pune Zika Virus । पुणे शहरात झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. एरंडवणे परिसरातील २८ वर्षीय गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. आता गेल्या शुक्रवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर सोमवारी आणखी एका गर्भवती महिलेला संसर्ग झाल्याचे निदान झाले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही महिलांची प्रकृती ठीक आहे. गर्भवती महिलांमध्ये, झिका विषाणूमुळे गर्भामध्ये मायक्रोसेफली (असा स्थिती ज्यामध्ये मेंदूच्या असामान्य विकासामुळे डोके खूपच लहान होते) होऊ शकते. झिका विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण एरंडवणे येथे आढळून आला, जेव्हा 46 वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
Lonavala News । लग्नासाठी आले अन् भुशी डॅम फिरायचं ठरवलं; पण घडलं भयानक
झिका व्हायरस कसा पसरतो?
झिका विषाणू एडिस इजिप्ती आणि अल्बोपिक्टस या संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा विषाणू लैंगिक संपर्काद्वारे, रक्ताच्या संसर्गाद्वारे किंवा प्रसूतीदरम्यान संक्रमित मातेकडून मुलामध्ये प्लेसेंटाद्वारे खूप वेगाने पसरतो. म्हणून, गर्भवती महिलेने पहिल्या तिमाहीत अल्ट्रासाऊंड स्क्रीनिंग करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
Bjp । ब्रेकिंग न्यूज! भाजपने जाहीर केली विधानपरिषदेच्या ५ उमेदवारांची नावे