Pusesawali Riots । साताऱ्यातील पुसेसावळी या ठिकाणी सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चांगलीच दंगल उसळली. या संतप्त जमावाने प्रार्थनास्थळावर केलेले हल्ल्यात जवळपास 11 जण जखमी झाले आहेत. तर एक जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नूरहसन शिकलगार असे आहे. दरम्यान या दंगली प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला आहे. यावेळी त्यांनी थेट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. (Pusesawali Riots)
Manoj Jarange Patil । गावकऱ्यांच्या आग्रहाखातर जरांगे पाटलांनी घेतली सलाईन, आज घेणार मोठा निर्णय
यासंदर्भात आज जिल्हा रुग्णालय परिसरात ठिय्या मारला आहे. याबाबत पुरवणी तक्रार देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भेटीत झालेल्या चर्चेअंती भाजपचे पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने युवकाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला असल्याची देखील माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे दिवसभर गावामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली. त्याचबरोबर या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. या घटनेमध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. सरफराज बागवान असं जखमी व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीच्या फिर्यादीवरून औंध पोलिसात तब्बल दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maratha Reservation | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आरक्षण देण्यास सरकार तयार पण…