
Pushpa 2 Teaser । दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. सोशल मीडियावरही तो सक्रिय असतो. त्याच्या फॉलोवर्सची संख्याही खूप आहे. आज अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाचा म्हणजे ‘पुष्पा 2’चा (Pushpa 2) आज धमाकेदार टीझर रिलीज केला आहे. सर्वचजण या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते. (Pushpa 2 Teaser Out)
पहा टीझर
येत्या 15 ऑगस्ट रोजी ‘पुष्पा 2 : द रूल’ हा (Pushpa 2 : The Rule) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Allu Arjun new movie) टीझर रिलीज करण्यापूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं होतं. यात अल्लू अर्जुन पुष्पाच्या अंदाजात पाहायला मिळाला होता. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनच्या हातात कुऱ्हाड होती. तो पुष्पा स्टाइलमध्ये सिंहासनावर बसला होता. त्याचा हा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे.
Amol Kirtikar । ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! बडा नेता ईडीच्या फेऱ्यात
रिलीज केलेल्या टीझरमध्ये पायात घुंगरू, डोळ्यात आग, हातात त्रिशूल आणि अर्धनारीच्या लूकमध्ये पुष्पाचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली आहे. देशातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा 2’चा समावेश आहे. चित्रपट पुष्पा : द राइज याचा सीक्वेल असून टीझरवरून चित्रपट कोटींचा गल्ला जमवणार, हे जवळपास निश्चित आहे.
IPL 2024 । लखनऊला सर्वात मोठा झटका! स्टार खेळाडूला मोठी दुखापत, एकाच ओव्हरनंतर…