Jitendra Awhad । ‘घोडा लावला, हे शब्द…. ताई जरा जपून’; जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवरून चर्चा

'Put a horse, these words…. Tae be careful'; Discussion from Jitendra Awad's post

Jitendra Awhad । मुंबई : आज राष्ट्रपीता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती असून संपूर्ण देशभरात महात्मा गांधींची जयंती (Mahatma Gandhi Jayanti) उत्सहात साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम आणि कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. शिवाय राज्यातही अनेक नेत्यांकडून गांधी विचारांना उजळणी देण्यात येत आहे. असे असताना एका महिलेने आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)

Laser Light । गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचणे आले अंगलट, लेझर लाईटमुळे 6 जणांचा डोळा जाण्याची शक्यता

‘अहिंसेच्या शस्त्राला हिंसेच्या अमोघ शस्त्राने घोडा लावणाऱ्या पंडित नथुराम गोडसे यांना त्रिवार अभिवादन,’अशी पोस्ट एका महिलेने केली आहे. त्या महिलेची पोस्ट (Post) शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ह्या भगिनी कोण आहेत. घोडा लावला … हे शब्द…. ताई जरा जपून”. दरम्यान, आव्हाड यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

Desi Jugad । जुन्या वस्तूंपासून शेतकऱ्याने बनवला भन्नाट ट्रॅक्टर; १ लिटर डिझेलमध्ये १० गुंठे शेत नागंरणार

अनेकजण गांधी विचारांना उजळणी देत आहेत. परंतु, काही समाजकंटक महात्मा गांधींच्या जयंतीदिवशी राष्ट्रपीत्यावर सर्रासपणे टीका करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काहीजणांकडून निशस्त्र आणि अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींवर गोळी चालवणाऱ्या भ्याड नथुराम गोडसेचा गोरवोद्गार केला जात आहे.

Love Story | टिकटॉकवर जडला जीव, प्रेमापोटी बांगलादेशवरून युपीला गेली ३ मुलांची आई; पुढे घडलं असं…

Spread the love