मुंबई : युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन (Britain) देशाची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. प्रकृतीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणीपदावर तब्बल ६९वर्षे राहण्याचा विक्रम एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदला गेलाय.
Ajit Pawar: “बारामतीत माझे काम बोलते”, अजित पवारांचा विरोधकांच्या बारामती दौऱ्यावरून घणाघात
राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth)द्वितीय ब्रिटनच्या महाराणी असताना त्यांना संपूर्ण आयुष्यात अनेक भेटवस्तू मिळाल्या. परंतु या सर्व भेटवस्तू (Queen Elizabeth) मध्ये एक भेटवस्तू अतिशय मौल्यवान होती. ही भेटवस्तू म्हणजे खुद्द महात्मा गांधी यांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांना हात रुमाल दिला होता. तो रुमाल (Handkerchief) त्यांनी आयुष्यभर सांभाळला आहे.
Ajit Pawar: मतदानावेळी कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना माहितीये, अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार
तसेच राणी एलिझाबेथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ब्रिटनदौऱ्यावेळी तो रुमाल मोदींनाही दाखवला होता. राणी एलिझाबेथ यांचा नोव्हेंबर 1947 मध्ये फिलीप माऊंटबॅटन यांच्याशी विवाह पार पडला. दरम्यान या विवाह सोहळ्याला महात्मा गांधीही उपस्थित होते.यावेळी गांधीजींनी राणी एलिझाबेथ यांना रुमाल भेटवस्तू म्हणून दिला होता.
पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान मोदींनीही राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर दुखं व्यक्त केले आहे. “2015 आणि 2018 मध्ये माझ्या लंडन भेटीदरम्यान राणी एलिझाबेथ यांच्याशी झाली होती.ही भेट खूप स्मरणीय होती.मी त्यांचा प्रेमळ स्वभाव कधीही विसरू शकत नाही.दरम्यान यावेळी त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट दिलेला रुमालही दाखवला होता.”