Site icon e लोकहित | Marathi News

चक्क लोकांनी उचलले घर; ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

Quite people picked up the house; You will also be amazed after seeing this video!

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे संवाद व मनोरंजनाचे मोठे साधन बनले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर व whatsapp यांच्या माध्यमातून लोक विविध गोष्टी पाहतात. सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ देखील असतात. हे व्हिडिओज पाहून अनेकदा आपण थक्क देखील होतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ( Viral Video). या व्हिडिओला लोकांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. आता तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल ना, की या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे ?

मोठी बातमी! प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालचा अपघात

तर झालंय अस सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ‘गुड न्युज मोमेंट’ या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून याला 27 लाखांच्या पुढे व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये काही काही लोकांचा समूह चक्क घर खांद्यावर घेताना पहायला मिळत आहे. आता लोक घर कसे उचलणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? परंतु, हे घर लाकडाचे आहे. लोकांनी उचलून घेतलेल्या या घराला खाली लाकडाचे पाय दिसत आहेत.

ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये सोन्याची खाण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

खरंतर हा व्हिडिओ फिलिपिन्स इथला असून व्हिडिओ मध्ये दिसणारे घर हे एका वृद्ध व्यक्तीचे आहे. या वृद्ध व्यक्तीच्या घरातील इतर सदस्य त्याच्यापासून दूर राहतात. आपल्या वृद्धपकाळात कुटुंबातील व्यक्तींसोबत राहण्याची या व्यक्तीची इच्छा होती. त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सदस्य व शेजाऱ्यांनी मिळून घर उचलण्याचा प्रयत्न केला. गरजेच्या वेळी शेजाऱ्यांनी केलेली मदत पाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 7 फूट उंचीचे हे घर उचलून घेऊन जाण्यासाठी लोकांना 2 तास वेळ द्यावा लागला.

दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यासाठी दूध संघटनेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version