काही महिन्यांपूर्वी राज्यात भलामोठा राजकिय भूकंप येऊन गेला. त्याचे हादरे आजही महाराष्ट्राला बसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारात जवळजवळ शिवसेनेचे 40 आमदार फोडले. यानंतर स्वतःचा नवीन गट स्थापन करून भाजपाशी युती केली व राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. या काळात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. मात्र, हे मिशन सोप्प न्हवत असं विधान गिरीश महाजन ( Girish Mahajan) यांनी केले आहे.
धक्कादायक! शैक्षणिक सहलीला गेलेले विद्यार्थी रायगडच्या समुद्रात बुडाले
ठाकरेंना कंटाळून शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडणे हे सोप्पे न्हवते.आमच्या मागे चामुंडा माता व लोकांचे आशीर्वाद होते. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक त्यांच्या पक्षप्रमुखाला व सरकारला कंटाळून बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. आम्हाला वाटत होतं की, आमच हे मिशन फेल होईल. 40 लोक जमा करणे ही सोप्पी गोष्ट न्हवती. त्यात पुढारी लोक कसे असतात ते तुम्हाला माहित आहे. मात्र ते देखील आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणूनच हे बंड यशस्वी झाले असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
प्रवीण तरडे यांची मोठी घोषणा! मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मागील वर्षीच्या जूनमध्ये 21 तारखेला महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड झाले. यावेळी एकनाथ शिंदे सुरतला निघून गेले. सुरुवातीला त्यांच्यासोबत 15-18 आमदार होते. नंतर यांच्या संख्येत वाढ होत गेली एकनाथ शिंदे हे जेव्हा बंड केलेल्या आमदारांसह गुवाहाटीला गेले तेव्हा ही संख्या ३५ च्याही पुढे गेली. या बंडाला जेव्हा तीन दिवस झाले तेव्हा ही संख्या ४० झाली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी 29 जूनला फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार; विजेत्याला मिळणार महिंद्रा थार!
यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. लगेचच 30 जूनला राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यासर्व घटना फक्त 9 दिवसांच्या कालावधीत घडल्या आहेत. मात्र हे मिशन सोप्प न्हवतं. अशी कबुली गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे.
इंदुरीकर महाराजांच्या सासूचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला मोठा धक्का!