Gautami Patil । तुम्ही अनेक दिवसांपासून गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव ऐकत असाल. ‘सबसे कातील, गौतमी पाटील’नं काही वेळातच आपली ओळख तयार केली आहे. तिचा कार्यक्रम कुठेही असो तिच्या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी पाहायला मिळते. परंतु आता तिच्या जवळपास सर्वच कार्यक्रमात राडा होत आहे. त्यामुळे गौतमी पाटील आणि राडा हे समीकरण झाले आहे. अलीकडे तिच्या कार्यक्रमाची मनोरंजनामुळे नाही तर राड्यामुळे चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. तिच्या कार्यक्रमात पोलिसांचा (Police) बंदोबस्तही केला जातो.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये करणार प्रवेश; महाडिकांचा दावा
तिच्या अशाच एका कार्यक्रमामुळे चर्चा रंगली आहे. नांदेड (Nanded) जिल्हयातील धर्माबाद येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी गोंधळ घातला. स्टेजजवळ मोठी गर्दी जमली आणि खुर्च्यांचीही मोडतोड करण्यात आली. त्यावेळी तैनात असणाऱ्या पोलिसांनी हुल्लडबाजांना चांगलाच चोप दिला. गौतमीनेही प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अवघ्या 10 मिनिटातच बंद पडला.
“…म्हणून दीपक केसरकर यांनी मला ऑफर दिली असेल” अजित पवार बोललेच
नांदेड जिल्हयातील धर्माबाद येथे शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख आकाश रेड्डी (Akash Reddy) यांच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिच्या सर्व कार्यक्रमात गोंधळ होत असल्याने या देखील कार्यक्रमात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्हिडिओ चित्रीकरण, ड्रोनची मदत घ्यावी लागणार असे यापूर्वी सांगण्यात आले होते.
सर्वात मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, हिंदू महासंघाची मोठी मागणी