महाराष्ट्रात खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र गौतमी पाटीलचे चाहते आहेत. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या डान्सच्या व्हिडिओला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. दरम्यान गौतमी पाटील बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. बिग बॉस 3 मध्ये मास्टरमाइंड म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. उत्कर्ष शिंदे त्यांच्या आगामी गाण्यात गौतमी पाटीलला घेणार आहेत. याबाबत स्वतः उत्कर्ष शिंदे ( Dr. Utkarsh Shinde) यांनी माहिती दिली आहे.
डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर गौतमी ( Gautami Patil) सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते गौतमी पाटील सोबत चर्चा करताना दिसत आहेत. तसेच यासोबत त्यांनी लिहिले आहे की, “ओ शेठ लै दिसान झालीया भेट! या सुपरहिट लावणीनंतर यावर्षी तुम्हा सर्वांसाठी माझं नवीन लिखाण येत आहे. नवं संगीत नव्या गायिकेसोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार…..ते सुद्धा लवकरच!”
मोठी बातमी! सलमान खानची सुरक्षा वाढणार, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
यासाठी उत्कर्ष शिंदे आदर्श शिंदे यांच्यासोबत लावणी गाणार असून या गाण्याचे रेकॉर्डिंग देखील सुरू झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच शिंदेशाही गाण्यावर ताल धरताना दिसून येणार आहे. लवकरच गौतमीचा घुंगरू हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्री वेडिंग शूट करायला गेले अन् घडलं भलतंच! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क