अवघ्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे ( Gautami Patil) नाव घराघरांत पोहोचले आहे. तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आणि तिची लावणी सध्या चर्चेचा विषय ठरतोय. राज्यात अनेक ठिकणी गौतमी पाटीलच्या लावणीचे कार्यक्रम होत आहेत. परंतु, या कार्यक्रमांमध्ये सर्रास राडे होताना पहायला मिळत आहेत. सांगली,फलटण येथील कार्यक्रमांमधील धक्कादायक प्रकारांनंतर बीड ( Beed) मध्ये देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाला आहे.
“बिनकामाचे लोकं मोर्चा काढतात”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला
बीडमध्ये राजुरी येथे एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तिची लावणी पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. दरम्यान, गौतमी नाचत असताना चाहते बेभान होऊन थेट ती नाचत असलेल्या स्टेजवरच चढले. इतकंच नाही तर स्टेजवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. यामध्ये काही जणांना दुखापत झाली असून गौतमी पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
ठाकरे गटाला धक्का! उरलेले आमदारही सोडणार साथ?
गौतमी पाटील हिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. लावणी करताना अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप मागील अनेक दिवसांपासून गौतमीवर होत आहेत. परंतु, तरी देखील तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. तसेच कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा अनुचित प्रकार देखील घडतात.