मागच्या काही दिवसापासून कोयता गॅंगने (Coyote Gang) दहशद माजवली आहे. ही गॅंग गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत आहे. त्याचबरोबर लोकांवर वार करायला देखील घाबरत नाही. त्यामुळे या गॅंगने लोकांच्या मनात भीती निर्माण केली. या गॅंगला पकडण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले देखल उचलली. या गॅंगमधील काही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. मात्र तरीदेखील कोयता गँगची दहशद कमी झालेली नाही.
एक लिटर दुधाला देशी दारूच्या क्वॉर्टर एवढी किंमत द्या; ‘या’ बड्या नेत्याची मागणी
आता पुण्यातील वारजे भागात पुन्हा एकदा कोयता गँगने राडा केला आहे. या गॅंगने गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. माहितीनुसार, वारजे रामनगर कॅनॉल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ७ वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली. सोमवारी (आज) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वरात दारात येऊन थांबली अन् अचानक नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून हादराल
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस दाखल झाले. आता पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. कोयत्या गँगने दोन ऑटो रिक्षा, एक इको कार, एक महिंद्रा झायलो त्याचबरोबर एक सफारी कार आणि दोन दुचाकींची तोडफोड केली आहे.
मोठा अपघात! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीत वाहन घुसलं, अपघातात वारकरी गंभीर जखमी