
Political News । सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून ओबीसींमधून (OBC) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे. अशातच आता आरक्षणासाठी धनगर समाज (Dhangar Community Protest) देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
Wheat Price । गव्हाच्या किमतीत विक्रमी वाढ, रचला नवीन रेकॉर्ड; पहा किती मिळतोय भाव?
या आंदोलकांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध केला आहे. यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला. आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नका, असे आदेश त्यांनी दिले आहेत. (Dhangar Protest)
“भंडारा नेहमी पवित्र असतो. पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला त्याचा आनंद आहे. कार्यकर्त्यांची नेहमीच प्रतिकात्मक गोष्टी करण्याची भावना असते. मी या आंदोलकांना माफ केले आहे. भंडारा उधळण्याच्या आणि आंदोलकांना मारहाण होण्याच्या एका घटनेमुळे भाजपवर कसलाच परिणाम होणार नाही. मी त्यांचं निवेदन स्वीकारलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Maratha Reservation । “मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणं शक्य नाही” पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाला आरक्षण दिले जावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये त्यामुळे आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज या मागण्यांसाठीच धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा उधळला.