वेळोवेळी मागणी करूनही मराठा आणि धनगर समाजाला अद्याप आरक्षण (Maratha and Dhangar Reservation) मिळाले नाही. त्यावरून आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी महाविकास आघडीवर निशाणा साधला आहे. ”मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुकवरून कारभार केला. न्यायालयात त्यांनी आरक्षणसंदर्भात कागदपत्रे सादर केली नाहीत त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले,” असा खळबळजनक आरोप विखे पाटील यांनी केला आहे.
धक्कदायक! दवाखान्यासाठी पैसे नाहीत म्हणून तरुणाने केले भयानक कृत्य
कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदी होते त्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयापर्यंत गेले होते. आत्ताचे शिंदे-फडणवीस सरकार मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी झटकणार नाही. त्यांना आरक्षण मिळेपर्यंत सारथीसारखी संस्था उभारून आर्थिक मदत केली जाईल. तसेच धनगर समाजाला शेळी-मेंढी सहकारी महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
‘जनतेच्या शापामुळे समृद्धी महामार्गावर अपघात झाला’ संजय राऊत यांचा राज्य सरकारवर धक्कादायक आरोप
एकीकडे मराठा समाजासाठी हे सरकार झटत आहेत तर दुसरीकडे ठाकरे यांनी फेसबुकवरून कारभार केला अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता विखे पाटील यांच्या टीकेला महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करतात’; ठाण्यातील राजकारणावरून जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप