Rahul Gandhi । ब्रेकिंग! राहुल गांधी यांना खासदारकी मिळणार; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा

Rahul Gandhi Breaking Rahul Gandhi to get MP; The Supreme Court gave a big relief

Rahul Gandhi । दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोदी आडनावाच्या मानहानी प्रकरणी मिळालेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Delhi Services Bill । दिल्ली सरकारच्या अधिकारांना अडचणीत आणणारे विधेयक आज राज्यसभेत, कोण मारणार बाजी?

मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांची खासदारकी देखील रद्द केली होती. यानंतर राहुल गांधींनी न्यायालयामध्ये धाव घेतली दरम्यान आता राहुल गांधींसाठी दिलासदायक बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळणार आहे.

Nitin Desai Death । नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अजित पवार यांचे आश्वासन

Spread the love