Rahul Gandhi Flying Kiss । नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी भाजपवर (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur violence) मुद्द्यावरून भाजप सरकारला चांगलेच घेरले. (Latest Marathi News)
परंतु सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी केला आहे. त्यांची ही कृती चुकीची आहे असे सांगत भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
Onion Market Price । शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! ‘या’ ठिकाणी कांद्याला मिळाला सर्वोच्च भाव
दरम्यान, राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु राहुल गांधींची कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असावी, त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करण्यात यावे, अशी मागणी आता भाजपकडून जोर धरू लागली आहे.