
दिल्ली : २०१९ मध्ये साताऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भरपावसात केलेल्या भाषणाच्या आठवणी आजही आहेत. त्यानंतर आता काँग्रेस खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जोरदार बरसणारा पाऊस अंगावर झेलत कर्नाटकाच्या म्हैसुरमध्ये भाषण केलं आहे. त्यांच्या या सभेचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
व्हिडीओ ट्वीटरवर (twitter) पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “कुठलाही अडथळा ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य गाठण्यापासून रोखू शकत नाही”, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. ही यात्रा कन्याकुमारीतून (Kanyakumari) सुरू झाली आता या यात्रेचा मुक्काम सध्या कर्नाटकमध्ये (Karnataka) आहे.
No excuses. Only passion.
— Congress (@INCIndia) October 2, 2022
There is no hurdle big enough to stop #BharatJodoYatra from achieving its goal. pic.twitter.com/puKgKeVZ1E
दरम्यान कन्याकुमारीमधून, काँग्रेसने साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा सुरू केली. वाढती महागाई (inflation), बेरोजगारी (Unemployment) त्याचबरोबर जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता या सर्वांकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसकडून ही यात्रा करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने लॉन्च केले ‘जलदूत ऍप’, आता शेतकऱ्यांना मिळणार विहीरींच्या पाणी पातळीची माहिती