
Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे आता संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधी दिसणार आहेत. खासदारकी बहाल करण्याची ऑर्डर देखील काढण्यात आली आहे. राहुल गांधी यांना मोदी आडनावा प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष करून आनंद व्यक्त केला आहे. याबाबत लोकसभा सचिवालयाने एक ऑर्डर काढून राहुल गांधी यांना खासदारकी बहाल केली आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी देखील हा मोठा दिलासा मानला जात आहे.
राहुल गांधी आज संसदेमध्ये हजर राहणार
राहुल गांधी हे खासदारकी मिळाल्यानंतर आज लगेचच लोकसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. त्याचबरोबर उद्या ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास ठरावर देखील चर्चा होणार आहे. त्यामुळे आता राहुल गांधींना खासदारकी मिळाली असून ते सरकारचे वाभाडे काढणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
Share Market । गुंतवणूकदारांनो, ‘या’ महत्त्वाच्या शेअर्सवर ठेवा लक्ष; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या
कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
राहुल गांधी यांना खासदारकी मिळाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष साजरा करत हा आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या कार्यालयासमोर ढोल ताशे वाजवून एकमेकांना पेढे भरवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, केली मोठी मागणी