काल दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर ( Jantarmantar) वर सुरू असणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर व त्यांच्या कुटूंबियांवर कठोर कारवाई केली. यावेळी त्यांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे जाणाऱ्या महिला कुस्तीपटूंना (Woman wresselers) अतिशय चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले. तसेच दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police) कुस्तीपटूंचा तंबूसुद्धा हटवला आहे. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Ajit Pawar | अजित पवारांनी थेट हॉटेल मालकाला उभे केले शॉवरखाली! कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन काल पार पडले. या भव्य दिव्य कार्यक्रमाला देशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तर दुसरीकडे देशाचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना अत्यंत चुकीची वागणूक दिली गेली आहे. याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IPL Final | आयपीएलच्या फायनल मॅचला पावसाची हजेरी! आता ‘या’ तारखेला होणार सामना
राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशात एवढा मोठा कार्यक्रम होत असताना, देशासाठी पदक मिळवून देणाऱ्या महिलांना मिळालेली वागणूक यामुळे राहुल गांधींनी नाव न घेता मोदींना टोकले आहे. राज्याभिषेक पूर्ण, अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे. असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.
बिग ब्रेकिंग! चेन्नई सुपर किंग्सच्या ‘या’ बड्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, ट्विट करत म्हणाला…