
Rahul Gandhi । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत भाजपने गुरुवारी (२२ नोव्हेंबर) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress State President Mallikarjun Kharge) यांच्याविरोधातही आयोगाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. भाजपने मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार करत दोन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी केली. (Latest Marathi News)
Virat Kohli Retirement । विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत भविष्यवाणी! व्हायरल पोस्टवरून चर्चा
राहुल गांधी यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) राजस्थानमधील (Rajasthan) एका निवडणूक सभेत “पीएम म्हणजे पनौती मोदी” असे म्हटले होते. त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दावा केला होता की, पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची जात ओबीसी यादीत समाविष्ट करण्यात आली होती. त्यांनी पंतप्रधान मोदींना खोटारडे सरदार म्हटले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट विश्वचषक फायनल दरम्यान अहमदाबाद स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीने देशाच्या संघाचे दुर्दैव घडले आणि तो सामना हरला, “पीएम म्हणजे पनौती मोदी” असे राहुल गांधी म्हणाले होते.
Salman Khan Viral Video । सलमानने भर गर्दीतच महिला पत्रकाराला केलं किस; व्हिडीओ झाला व्हायरल