राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता यावर राहुल गांधी यांनी स्वतः ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
राहुल गांधीनी ट्विट करत लिहिले की, “मी भारतासाठी लढतो आहे आणि मी त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे ते म्हणाले”. सध्या त्यांचे ट्विट चर्चेत आहे.
मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2023
मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।
नेमकं काय आहे प्रकरण?
मोदींना त्यांच्या आडनावावरुन डिवचने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. राहुल गांधी यांनी एका सभेदरम्यान मोदी या आडनावावरून टिपण्णी केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने आता निकाल दिला असून राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटक येथे राहुल गांधी यांची मोदी ( Modi) आडनावावरून जीभ घसरली होती. यावेळी भाजपचे आमदार पुर्नेश मोदी यांनी भावंदी अंतर्गत मानहानीचा दावा दाखल केला होता.
“…अन् अमरीश पुरीने सेटवर गोविंदाच्या लगावली होती कानशिलात”; ‘या’ कारणामुळे झालं होतं भांडण