दिल्ली : राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ (Bharat jodo yatra) यात्रेचा आज चौथा दिवस आहे.ही यात्रेचा प्रवास कन्याकुमारी ते कश्मिर असा आहे. शनिवारी दुपारी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथील आशियातील पहिली महिला बस चालक 63 वर्षीय वसंताकुमारी आणि मार्तंडम येथे मनरेगा महिला कामगारांची (women workers) भेट घेतली. यावेळी एका महिलेने सांगितले की तिला राहुल गांधींच्या तामिळनाडू वरील प्रेमाबद्दल (TamilNadu love) माहिती आहे आणि राहुल गांधी “तमिळ मुलीशी लग्न” करण्यास तयार आहे.राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्याच्या शेवटी केरळ सीमेजवळ चहाच्या दुकानाच्या मालकांशी चर्चा करत आहेत.
बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात कॉंग्रेसने 7 सप्टेंबरला कन्याकुमारी पासून ‘भारत जोडो यात्रे’ला सुरूवात केली आहे.
तेव्हापासून ‘भारत जोडो यात्रे’बाबत भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजप नेत्यांनी भारत एकसंध असल्याने या यात्रेची गरज काय असा सवाल केला होते.
Rohit Pawar: आमदार रोहित पवारांनी उपलब्ध केली एक लाख लंम्पी लस, ताबडतोब लसीकरणही झाले सुरू
त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींच्या ‘विदेशी बनावटीच्या टी-शर्ट’वर टिका केली आहे. ” भारत हे राष्ट्र नाही ते आता परदेशी टी-शर्ट घालून भारताला एकत्र करण्याच्या यात्रेमध्ये आहे.” अस अमित शहा म्हणाले.