
Rahul Gandhi । राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांची नाशिकच्या चांदवड या ठिकाणी सभा होणार आहे. मात्र त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. चांदवड या ठिकाणी होणाऱ्या सभेपूर्वीच मोठा गोंधळ उडाला आहे. माकप नेते आमदार जे. पी. गावित यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या सभेला संजय राऊत, नाना पटोले त्याचबरोबर शरद पवार असे सर्वच इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. माकप देखील इंडिया आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. मात्र या पक्षातील आमदार जे. पी. गावित यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार जे. पी. गावित यांना राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी आडवलं. त्यानंतर त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलीस आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षारक्षकांकडून आमदार जे. पी. गावित यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Nilesh Lanke । ब्रेकिंग! आमदार निलेश लंके आजच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार? मोठी माहिती समोर