काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे ( Bharat Jodo Yatra) नेतृत्व करत असणारे राहुल गांधी सध्या चर्चेत आहेत. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार अशा विषयांवर या यात्रेत राहुल गांधी ( Rahul Gandhi) संवाद करत आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. निव्वळ याच कारणामुळे भारत जोडो यात्रेला देशभरात मोठे समर्थन मिळत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस यांच्यात संघर्ष सुरू? ‘या’ कारणामुळे राज्यात चर्चांना उधाण
या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी आपली आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्यासारखे गुण असलेली मुलगी भावी पत्नी म्हणून हवी आहे, असे सांगितले. यावर आणखी बोलताना ते म्हणाले की, ” इंदिरा गांधी फक्त माझी आजी नसून ती मला माझ्या आईसारखीच आहे आणि माझी आजी मला प्रचंड प्रिय आहे.”
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्याची महत्वाची घोषणा
मागील काही वर्षात राहुल गांधी यांना पप्पू या नावावरून हिनवले जात होते. यावर देखील राहुल गांधी यांनी या मुलाखतीमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. लोक मला काय बोलतात याची काहीच पर्वा मी करत नाही. मला कुणी कोणत्याही नावाने बोलावं. मला काहीच फरक पडत नाही. मी कुणाचा कुठल्याही प्रकारे द्वेष करत नाही. त्यामुळे मला शिव्या द्या किंवा मारा, मी तुमचा अजिबात द्वेष करणार नाही, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.
उर्फी जावेदचा अनोखा फॅशन सेन्स; नाश्त्याच्या प्लेटने झाकले शरीर