
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
“तरुण दारूच्या नशेत थेट आगीत पडला अन्…”, पाहा थरकाप उडवणारा Video
दरम्यान, आता राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून तोंडावर काळया पट्टया बांधून मूक आंदोलन केलं असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या आंदोलनाची सगळीकडे जोरदार चर्चा देखील चालू आहे.
“…गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा”, नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद काल देखील विधानसभेमध्ये उमटले होते. मात्र आज पुन्हा एकदा सकाळी विधानसभेचं कामकाज चालू होण्याआधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी तोंडावर काळया पट्टया बांधून केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
रोहित शर्माची संपत्ती वाचून तुमचेही फिरतील डोळे! महिन्याला कमावतो ऐवढे कोटी…