“राहुल गांधींचा विचार गाडल्याशिवाय राहणार नाही” – देवेंद्र फडणवीस

"Rahul Gandhi's thought will not remain unburied" - Devendra Fadnavis

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात येऊन आठ दिवस उलटले आहेत. यावेळी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सावरकरांबाबत एक विधान केले आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले सावरकर हे ब्रिटिशांकडून पेंशन घेत होते. त्यांचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

मोठी बातमी! अज्ञात आंदोलकांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला

सावकर काँग्रेसच्या (Congress) विरोधात ब्रिटिशांची काम करत होते. ते दोन-तीन वर्ष अंदमानच्या तुरुंगात असून ब्रिटिशांनी त्यांना त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर सावरकर काम करायला देखील तयार झाले असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हटले आहेत. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्येच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हृदयद्रावक! १० महिन्याच्या चिमुकलीचा अंगावर गरम पाणी सांडून मृत्यू

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही”, या शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करणारं विधान केलं आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) राहुल गांधींसोबत पदयात्रा करतात. हे दृश्य पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल?, असा प्रश्न देखील फडणवीसांनी केला आहे.

आंदोलन करून प्रश्न सुटले नाहीत तर १८ तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचा गंभीर इशारा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *