Site icon e लोकहित | Marathi News

उद्धव ठाकरेंनी सांगून देखील राहुल कलाटे मागे हटत नाहीत; चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

Rahul Kalate does not back down even after being told by Uddhav Thackeray; Three-way fight in Chinchwad by-election

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची लढत आता तिरंगी झाली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी मधील नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीने ऐनवेळी नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे राहुल कलाटे नाराज झाले असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

सोलापूर लोकसभेच्या जागेवरून वातावरण पेटले! आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “कोण रोहित पवार?”

दरम्यान, राहुल कलाटे ( Rahul Kalate) यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. आज शिवसेनेचे नेते राहुल आहिर यांनी कलाटे यांना भेटून समजून काढण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंना फोन लावून बोलणं देखील करून दिले. मात्र तरी देखील राहुल कलाटे मागे हटले नाहीत.

मोठी बातमी! आदिलच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळतायेत धमक्या

याचा फटका राष्ट्रवादीच्या नाना काटेंना बसणार आहे. कारण चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्यानंतर ताकद असलेला नेता म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे. त्यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे. आधीच भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन भावनिक खेळी खेळली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने लोकप्रियता असलेला उमेदवार उभा कडून ताकद दाखवली आहे. यामुळे चिंचवड पोटनिवडणूकीत काय होणार? हे पाहणे रंजक असणार आहे.

बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, म्हणाले “येत्या १५ दिवसांत…”

Spread the love
Exit mobile version