पुणे-सोलापूर (Pune-Solapur) राष्ट्रीय महामार्गासंबंधित विविध समस्या तसेच दौंड तालुक्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांची आमदार राहुल कुल यांनी भेट घेतली.
सावधान! इन्स्टाग्राम वापरताय तर जरा जपून; सोशल मीडियावर प्राध्यापकाची लाखोंची फसवणूक
सप्टेंबर महिन्यात केंद्रीय वाहतूक मंत्री मा.ना श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेख़ाली व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक पुणे येथे पार पडली होती, सदर बैठकीमध्ये आपण पुणे -सोलापूर महामार्गासंबंधित विविध समस्या मांडल्या होत्या त्यानुसार पुढील पाठपुराव्यासाठी राहुल कुल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली.
दुग्धव्यवसाय तेजीत! पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; जनावरांच्या किमतीत वाढ..
बैठकीमध्ये ‘या’ मागण्या केल्या –
१) NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता (KM 16/800 ते 41/700 – लांबी 24.9 KM) या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.
२) पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील वाहतुकीची कोंडी सुटावी व वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत.
३) NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे.
सावधान! इन्स्टाग्राम वापरताय तर जरा जपून; सोशल मीडियावर प्राध्यापकाची लाखोंची फसवणूक
४) NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त नवीन अंडरपास बांधण्यात यावा.
NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्ताचे काम लवकरच सुरु करण्याचे तसेच पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व इतर सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील केंद्रीय वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिले आहे.
Gautami Patil: गौतमीला बॅक डान्सरसाठी मिळायचे ‘इतके’ मानधन; वाचा सविस्तर