Raigad News । धक्कादायक बातमी! शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

Raigad News

Raigad News । सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या आपण घटना पाहिल्या असतील. सध्या देखील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक आठ वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (dog attacks 8 year old school boy)

Maratha Reservation । मोठी बातमी! भाजप खासदाराच्या ताफ्यातील दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील धामणे या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून शाळकरी मुलगा शाळेतून घरी परतत असताना भटक्या कुत्र्यांनी या मुलावर हल्ला केला आणि या हल्ल्यांमध्ये शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Bjp । भाजपला धक्का! मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बड्या नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचा दिला इशारा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समर मंगेश प्रभाकर असे या मुलाचे नाव असून तो गुरुवारी शाळेतून त्याच्या मित्रांसोबत घरी चालला होता. यावेळी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला समरच्या डोक्यावर आणि पायावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समरला मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Maratha Reservation । ‘या’ कारणामुळे गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या’ मंगेश साबळे यांनी सांगितले मोठे कारण

सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे तेथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमची लहान मुले रोज दुपारी शाळेतून घरी येतात. त्यामुळे पुन्हा अशी घटना घडू नये. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Baba Maharaj Satarkar Passed Away । मोठी बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

Spread the love