सरकारने सैन्यात ( Army) भरती होऊ पाहणाऱ्या तरुण वर्गासाठी अग्निवीर ही योजना आणली होती. या अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना पुढील काळात नोकरीची संधी मिळावी यासाठी आता रेल्वे विभागाने ( Railway Department) पुढाकार घेतला आहे. रेल्वे आता आपल्या विविध विभागांतरर्गत होणाऱ्या थेट भरतीमध्ये अग्निवीरांना १५ टक्के अनुदान देणार आहे. तसेच अग्नीवीरांना ( Agniveer) वयाची अट आणि फिटनेस परीक्षण यामध्ये सूट दिली जाणार आहे. यामुळे रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी अग्निवीरांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफमधील अग्निवीरांना आरक्षण देण्याच्या निर्णयावर सध्या विचार सुरू आहेत. मीडिया अहवालानुसार, रेल्वेमधील आरक्षण – लेव्हल-१ मध्ये १० टक्के, लेव्हल-२ मध्ये ५ टक्के आणि त्यावरील अराजपत्रित पदांवर माजी सैनिकांसह अपंगत्व असलेले उमेदवार (PwBD) आणि कोर्स कम्प्लेटेड अॅक्ट अप्रेंटिस (CCAAs) यांना दिले जाणारे आरक्षण हे Horizontal Reservation असेल.
महाराष्ट्रातील दंगलींमागे नेमकं कोण? फडणवीस म्हणाले, “100 टक्के हे…”
रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना अधिकृत पत्र पाठवले आहे. यामध्ये रेल्वेमध्ये भरती करणाऱ्या संस्थांना वेतन लेव्हल १ आणि वेतन लेव्हल २ यासाठी भरतीमध्ये ठराविक उमेदवारांना सवलती देण्यास सांगितले आहे. यामध्यमातून भारतीय सैन्यात चार वर्षापेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या अग्निवीरांना अराजपत्रित पदावर सवलती व सुविधा मिळणार आहेत. या उमेदवारांना सहभागी होण्यासाठी २५० रुपये प्रवेश शुल्क म्हणून भरावे लागेल. मात्र लेखी परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर ही रक्कम परत मिळेल.
ब्रेकिंग! पुण्यात खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या, ७ मुलींना वाचविण्यात यश तर २ मुली बेपत्ता