
Weather Update । मुंबई : राज्याकडे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अशातच हवामान खात्याने (IMD) राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली आहे. परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजावरून (IMD Alert) शेतकऱ्यांसह सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. (Latest Marathi News)
गिरणी कामगारांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाला पोषक अशी स्थिती तयार होणार नसल्याने पुढील तीन दिवस पाऊस लांबणीवर पडणार आहे. 25 ऑगस्टपासून कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा (Heavy Rain in Maharashtra) जोर वाढू शकतो. शेतकऱ्यांसह सर्वजण पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत.
Pankaj Tripathi | ब्रेकिंग! पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन
तसेच या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे पुढील महिन्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण कोकणासह विदर्भात पावसाचा जोर वाढेल. राज्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते? काय सांगतो कायदा जाणून घ्या