सणासुदीच्या मुहूर्तावर ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फुल शेतीचं पावसामुळं नुकसान

Rain damage to farmers' flower crops in Ahmednagar district on the occasion of festival

अहमदनगर: राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Haivy rain) शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्याच्या फुल शेतीचं पावसामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळं बाजारात फुलांची (flawers market) आवक देखील घटली आहे. महत्वाची बाब म्हणजे येत्या दसरा दिवाळीत झेंडूसह (marigolds) इतरही फुलांना प्रचंड मागणी असते. परंतु पावसामुळे फुलांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात आहेत.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात होणार मोठी घट

फुलांच्या उत्पादनात झाली मोठ्या प्रमाणात घट

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा, अकोळनेर, वासुंदे, खडकवाडी या भागातील फुल शेतीला प्रामुख्याने फटका बसला आहे. इतकंच नाही तर फुलांच्या तोडीच्या हंगामात पावसामुळं फुलांवर करपा पडला आहे. तसेच फुलांमध्ये पाणी गेल्याने ती आतून सडली आहेत. त्यामुळं उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांच्याही खिशाला कात्री लगणार आहे.

धक्कादायक! नवरात्रीनिमित्त घातलेल्या मंडपाला आग लागून दोन जणांचा मृत्यू तर, ६४ जण होरपळले

आवक घटल्यानं फुलांच्या दरांमध्ये वाढ

सध्या नगरच्या मार्केटमध्ये फुलांची 30 ते 40 टक्के आवक कमी आहे. दरम्यान मार्केटमध्ये शेवंतीला 200 रुपये, भाग्यश्री शेवंती 150 रुपये, अष्टरला 160 ते 200, झेंडू 60 ते 80 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहेत. फुलांची आवक घटल्यानं दर वाढल्याचं व्यापाऱ्यांचे मत आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० ऑक्टोबरपर्यंत मिळणार ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान, वाचा सविस्तर

पारनेर तालुक्यात फुल शेती मोठ्या प्रमाणात

अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोठा पाऊस झाला आहे. दरम्यान पावसामुळं फुलांची गळती झाली आहे. त्यामुळे उत्पन्नात तब्बल निम्म्यानेच घट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. फुलांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे.
पारनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुल शेती करतात. यंदाच्या वर्षी फुलाच्या शेतीत शेतकऱ्यांना खर्च वजा जाता 10 ते 15 हजार रुपये एकरी शिल्लक राहत आहेत. पारनेर तालुक्यात भाग्यश्री शेवंती, पेपर व्हाईट शेवंती, पौर्णिमा, अष्टर आणि झेंडूचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. परंतु दोन ते तीन वेळा तोडणी झाल्यानंतर लगेचच पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Eknath Shinde: जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *