Site icon e लोकहित | Marathi News

Rain Update : चंद्रपूरमध्ये पुरस्थिती, मोठं मोठे बंगले बुडाले पाण्यात; समोर आले धक्कादायक फोटो

Rain Update: Flood situation in Chandrapur, big bungalows submerged in water; Shocking photos came out

Rain Update : मागच्या काही दिवसापासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत तर काहींची शेतजमीन पुराच्या पाण्यात बुडाली आहे. दरम्यान, चंद्रपूर (Chandrpur Rain News) मध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Agriculture News । धक्कादायक! साखर कारखानदारांनी थकवले FRP चे 800 कोटी रुपये, होणार कडक कारवाई

चंद्रपूर मधून काही धडकी भरवणारे फोटो देखील समोर आले आहेत. तेथील नागरिकांनी सोशल मीडियावर या पूरस्थितीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जे फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. चंद्रपूर शहरांमध्ये आठ ते दहा फूट पाणी आहे. सध्या चंद्रपूरला पाण्याने वेढा घातला असून अनेक लोकांनी घराच्या वरच्या मजल्याचा आधार घेतल्याचे समजत आहे एनडीआरएफ कडून देखील चंद्रपूर शहरांमध्ये मदत कार्य सुरू आहे. (Rain Update)

Tomato Price Hike । टोमॅटोने बदलले नशीब! ‘या’ गावातील 12 शेतकरी बनले करोडपती तर 55 लखपती

एनडीआरएफची टीम चंद्रपूर मध्ये प्रत्येक घराजवळ जाऊन विचारत आहे. घरात कोणी आहे का? सध्या त्या ठिकाणी मदत कार्य सुरू असून प्राण वाचवण्यासाठी लोक घराच्या छतावर गेले आहेत. या पूरस्थितीमुळे तेथील अनेक वाहनेअडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी बाहेर जाऊ नये असे देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Agriculture News । दिलासादायक बातमी! आता 5 गुंठ्यांचीही होणार खरेदी-विक्री, असा करा अर्ज

Spread the love
Exit mobile version