Rain Update । सध्या महाराष्ट्रासह अनेक वेगेवेगळ्या राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे. बिहारमध्ये देखील अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बिहारमधील रोहतास जिल्ह्यात पाऊस आणि सोसाट्याचा वारा यादरम्यान वीज पडून वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यात तीन जण गंभीररीत्या भाजले. यापैकी एकाला उच्च केंद्राकडे पाठवण्यात आले आहे. तसेच, दोन जणांवर बिक्रमगंज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Loksabha Election । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! नरहरी झिरवळ करणार शरद पवार गटात प्रवेश
त्याचवेळी, मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन जणांचा समावेश होता, जे पावसापासून वाचवण्यासाठी झाडाखाली उभे होते, मात्र विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिली घटना बिक्रमगंज पोलिस स्टेशन हद्दीतील गोटपा गावात घडली, जिथे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी झाडाखाली लपलेल्या पाचपैकी दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. अरविंद कुमार आणि ओमप्रकाश अशी मृतांची नावे आहेत. यावेळी एक जण भाजला, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Viral News । लग्न झाल्यानंतर नवरी बनली दरोडेखोर, लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन ठोकली धूम
याशिवाय घोसियान कला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ता बांधकामात मजूर म्हणून काम करणाऱ्या सुनील कुमारचा मृत्यू झाला, तर सूर्यपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मठगोठणी गावात खेळणाऱ्या आकाश या किशोरचाही वीज पडून मृत्यू झाला. दिनारा पोलीस ठाणे हद्दीतील गंजभडसरा रोड कालव्यावर बेनसागर येथील विनय चौधरी यांचा मृत्यू झाला. रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज, सूर्यपुरा आणि दिनारा पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
Arvind Kejriwal Bail । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर