
Rain Update । सध्या वातावरणात दररोज बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी थंडी वाजत आहे, कधी कडाक्याचे ऊन पडत आहे तर कधी कधी मुसळधार पाऊस देखील पडत आहे. दरम्यान आज राज्याच्या अनेक भागात आज सकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये ठाणे आणि पालघर परिसात जोरदार पाऊस झाला आहे. (Rain Update)
Mohammed Shami । कार दरीत कोसळताच स्टार गोलंदाज मोहम्मद शमी धावला मदतीसाठी; पाहा Video
दरम्यान यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे आणि पालघर मधील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्येच वीज पडून ठाण्यामध्ये एका इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली. रविवारी पहाटे ठाणे आणि शेजारच्या पालघर जिल्ह्यात काही भागात पाऊस पडला यानंतर ठाणे या ठिकाणी एका इमारतीला वीज पडल्याने आग लागली. (IMD Alert )
ठाणे येथील भिवंडी शहरातील कलेर भागातील दुर्गेश पार्क परिसरामध्ये असलेल्या इमारतीच्या प्लॅस्टिकच्या छताला सकाळच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसून इमारतीच्या प्लास्टिकच्या छताचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली.