Vidarbha Rain । नागपूर : राज्यात मागील काही दिवस पावसाने (Rain) दडी मारली होती. परंतु पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जाेर धरला आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने बळीराजा सुखावला आहे. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने पेरण्यांना वेग आला आहे. जर आणखी काही दिवस राज्याकडे पावसाने (Heavy rain) पाठ फिरवली असती तर शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट आले असते. (Latest Marathi News)
मागील दोन दिवसांपासून विदर्भात (Vidarbha) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे यवतमाळ, बुलडाणा, गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुलडाणा आणि अमरावतीमध्ये दोघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १३ मुख्य रस्ते बंद झाले आहेत.
Urfi Javed । उर्फी जावेदचा नवीन लूक पाहून चाहते वैतागले, म्हणाले; ‘तू इतकी वाईट..’
तर अकोला जिल्ह्यात पुलांवरून पाणी वाहत आहे त्यामुळे येथील गावांचा संपर्क तुटला आहे. या जिल्ह्यात जास्त २०२ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अनंतवाडी -आनंदनगर तांडा येथील पुरात अडकलेल्या ११० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरफच्या पथकाला यश आले आहे. हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्यात पुढील दाेन दिवस रेड अलर्ट तर नागपूर, वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.