Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

Lok Sabha Election

Lok Sabha Election । राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात घेताना दिसत आहे. या सभेदरम्यान नेते विरोधकांवर जहरी टीका देखील करत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे.

Rohit Pawar । “अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलं,” रोहित पवारांची जहरी टीका

भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख (Rais Kasam Shaikh) यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी (Abu Asim Azmi) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. याचा फटका आगामी काळात महाविकास आघाडीला बसू शकतो.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी मला…”

रईस शेख यांनी राजीनामा देताच शेकडो महिलांनी त्यांचे कार्यालय बंद केले. शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केल्याने त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. या महिलांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकत्रित येऊन जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

Kunwar Sarvesh Singh । धक्कादायक! काल मतदान आणि आज झाले भाजप उमेदवाराचे निधन; पुन्हा निवडणूक होणार का?

Spread the love