गेली 14 वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (TMKOC) हा मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. परंतु, या मालिकेतील कलाकार गेल्या काही दिवसांपासून रामराम ठोकताना दिसत आहेत. नुकतीच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
आदिल खानला अटक झाल्यानंतर राखी सावंतच्या वकिलाने दिली प्रतिक्रिया
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका टिव्ही जगातील प्रसिद्ध विनोदी मालिका म्हणून ओळखली जाते. 28 जुलै 2008 साली ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेने आतापर्यंत 3 हजारांहून अधिक एपिसोड पुर्ण केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातील टप्पूचे (Tappu) पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीचं ठरलं आहे.
“मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल…”; अभिनेत्री उर्फी जावेदचे ट्विट…
टप्पूचे पात्र साकारणारे राज अनादकटने (Raj Anadkat) मालिकेचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राजने चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली होती. यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना आश्वासनही दिले होते की ते काही ते लवकरच नवीन टप्पूचे नाव जाहीर करतील. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
महाविकास आघाडी सरकार पडण्यास नाना पटोलेच जबाबदार! शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, शोच्या निर्मात्यांनी ‘टप्पू’च्या भूमिकेसाठी नितीश भलुनीला कास्ट केले आहे. आता लवकरच नितीश ‘टप्पू’ या पात्रात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. नितीश लवकरच या शोचे शूटिंग सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. आता तो ‘जेठालाल’चा मुलगा ‘टप्पू’च्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.