Raj-Uddhav Thackeray । मुंबई : काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडली. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. शिवसेनेत फूट पडल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे अशी मागणी केली जात होती. (Latest Marathi News)
अशातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज-उद्धव भेटीमुळे एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढले आहे. जरी ठाकरे बंधू आले असले तरी त्यांची ही भेट राजकीय हेतूसाठी नव्हती. तर ती एका कार्यक्रमातील आहे. नुकताच राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा पार पडला. या निमित मुंबईतील दादरमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते.
Accident News । बस-दुचाकीचा भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू
कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांमध्ये या कार्यक्रमात काही वेळ चर्चा झाली. या कार्यक्रमातदोन्ही भावांनी एकमेकांची विचारपूस केली. रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मातोश्रींसोबत देखील संवाद साधला.
Salman Khan । हे काय? सलमानने अभिषेकला मारली मिठी, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या राय…”