Site icon e लोकहित | Marathi News

Thackeray-Fadanvis: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण

Raj Thackeray and Devendra Fadnavis meet; Inviting discussions

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात एक महत्वपूर्ण घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची भेट झाली आहे. ही भेट फडणवीस यांचे शासकीय निवास स्थान सागर बंगल्यावर झाली. या भेटीत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास एक तासभर चर्चा झाली. ही बैठक आगामी महापालिका (Mumbai Municipal Election) आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे.

Chandrasekhar Bawankule: भाजपच राज्याच्या 48 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष, बारामतीला करणार टार्गेट

राज ठाकरे आणि भाजप(BJP) हिंदुत्वाच्या अजेंड्यावर एकत्र येण्याची शक्यता आहे. तसेच राज ठाकरे यांच्या नव्या शीवतीर्थ (Shivtirth home )या घरी पहिल्यांदाच गणपतीचं आगमन होणार आहे.म्हणून या नव्या घरी गणरायाच्या दर्शनाला यावं, असं आमंत्रणही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.

या चर्चांना उधाण

मराठी मतदारांना सोबत घेण्यासाठी भाजपला मनसेशी गाठ बांधन फायद्याचं ठरू शकतं.तसेच भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांमध्येही मनसेला सोबत घेण्याविषयी चर्चा झाली आहे.महत्वाचं म्हणजे मनसेने भाजपसोबत निवडणुकीत एकत्र यावे, अशी भाजपच्या नेत्यांचीही भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे.

Karan-Tejasswi: एस्केलेटरवर करण आणि तेजस्वीने केले एकमेकांना किस; पाहा व्हायरल VIDEO

मुंबईचा अमित शहांचा दौरा ठरणार महत्वपूर्ण

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांचा हा मुंबई दौरा महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातोय. हा दौरा गणेशोत्सवावेळी होणार आहे तसेच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना गणेशाच्या दर्शनासाठी आमंत्रण देणं, यामागे अनेक मोठे राजकीय अर्थ असू शकतात, हे लक्षात घ्यावं लागेल. तसेच महापालिकेत इतर पक्षांसोबत भाजपची काय स्ट्रॅटजी असेल, त्यावर या दौऱ्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Spread the love
Exit mobile version