Raj Thackeray । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे. भाजपने आपल्याला युतीसाठी ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Politics News )
Sheep Insurance । सरकारची मोठी घोषणा! 1 रुपयांत मिळणार मेंढ्यांचा विमा?
भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भाजप सोबत आधीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेणार नाही. असा मोठा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे, त्यामुळे आता सध्या राज ठाकरेंनी ही ऑफर नकारली असली तरी आगामी काळामध्ये भाजप सोबत राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार का? अशा चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्याआहेत. (Marathi Batmya)
Lumpy Skin Disease । कोल्हापूरनंतर अहमदनगरमध्ये लम्पी आजाराने घातले थैमान; पशुपालक चिंतेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “भाजपने युतीसाठी ऑफर दिली आहे मात्र मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलो नाही” असे ते म्हणाले आहेत.