Site icon e लोकहित | Marathi News

लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले…

Raj Thackeray emotional on Lata Mangeshkar's first death anniversary; Sharing the post said…

लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी अनेकांनी लतादीदींना अभिवादन केले आहे. यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील अभिवादन केले आहे, राज ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट शेअर केले आहे,

मोठी बातमी! रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ट्विट करत राज ठाकरे यांनी लिहिले की, “दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन ” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

ऊसतोड कामगाराच्या मुलाचा मृत्यु, थंडीचा त्रास होतोय म्हणून चुलीसमोर ऊब घ्यायला गेला अन्…

राज ठाकरेंबरोबर अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिलाय.

ब्रेकिंग! कॉग्रेसकडून कसब्यात रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर

Spread the love
Exit mobile version