मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj thakarey) यांनी शस्त्रक्रियेनंतर प्रथमच पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली आहे. मनसे(Mns)आता केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे तर स्थानिक पातळीपासून ते लोकसभेपर्यंतच्या तयारीला लागली आहे.कारण मनसेनं राष्ट्रवादीचा(Ncp) बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील लोकसभा (loksabha) मतदारसंघात पक्ष निरीक्षकांची निवड केली आहे.याच जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभेच्या मतदार संघात ह्या पक्ष निरीक्षकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवाय पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुका मनसे लढणार असे संकेत दिले जातायेत.
पुणे जिल्ह्यातून पक्ष निरीक्षकांची निवड
पुणे जिल्ह्यातील तिन्हही लोकसभा मतदार संघात मनसेने पक्ष निरीक्षकांची निवड केली आहे. यामध्ये मावळ मतदारसंघासाठी किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुते हे असणार आहेत.तर शिरुर लोकसभा मतदार संघासाठी अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचं वर्चस्व असणाऱ्या बारामतीची जबाबदारी ही वसंत मोरे, सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांच्यावर राहणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थावरही लक्ष
आतापर्यंत विशिष्ट शहारांपुरता मर्यादित असलेला मनसे हा पक्ष स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्येही सहभागी होणार असून पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगपरिषदेच्या निवडणुका लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकावर जोर वाढणार आहे.
Prasad Oak : दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी….., प्रसाद ओकने सांगितला ‘तो’ किस्सा
राज ठकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाहीतर सध्या राज्याच्या राजकारणात अस्थिर परस्थितील संधी म्हणून पहा आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर द्या. शिवाय आगामी काळात सबंध महाराष्ट्रभर दौरेही असणार असेही ते म्हणाले आहे.