
Raj Thackeray । राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील त्यांच्या संघटनेचे निवडणूक चिन्ह तुतारीचे अनावरण केले. तुतारीचे लोकार्पण करताना शरद पवार म्हणाले की, शिवाजी महाराजांनी येथून स्वराज्य स्थापन करून सर्वसामान्यांसाठी काम केले. ही संघर्षाची सुरुवात आहे. यातूनच सर्वसामान्यांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल. या लोकार्पण सोहळ्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
राज ठाकरे म्हणाले, “आतापर्यंत शरद पवार यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही. आता त्यांना छत्रपती आठवत आहेत. शरद पवार यांना आज रायगडाची आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल्यामुळे मुसलमानाची मते जातात, असे त्यांना वाटत होते. असं राज ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवार यांनी तुतारी चिन्हाचे रायगडावरुन अनावरण केले. त्यासंदर्भात राज ठाकरे बोलत होते.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका
त्याचबरोबर यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, “मराठा आरक्षणावर मी बोललो होतो. आता तसेच झाले ना? मी जे बोलतो ते तुम्हाला नंतर पटते. त्यामुळे माझ्या काळ्या केसांवर जाऊ नका, असा टोला देखील राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणातील लोकांना लगावला आहे.
Sadabhau Khot । सदाभाऊ खोत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली सर्वात मोठी मागणी!