नागपूर : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भ दौऱ्यावर निघाले आहेत. यावेळी मुंबई ते नागपूरचा ( Mumbai to Nagpur) प्रवास त्यांनी रेल्वेने केला आणि ते नागपूरमध्ये पोहचले आहेत. राज ठाकरे या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर, अमरावतीतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सविस्तर चर्चा करतील. त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पाश्वभूमीवर ही बैठक होणार असून हा दौरा देखील त्यासाठीच आहे.
राज ठाकरेंचा विदर्भ (Vidarbha) दौरा पाच दिवसांचा म्हणजेच २२ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. यावेळी राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतील हे पाहून महत्वाचं असून राज ठाकरे यावेळी नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दौरा करणार आहेत.
दरम्यान, मागच्या काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर सशस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी सांगण्यात आले होते. पण, सशस्त्रक्रियानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा असणार आहे. मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे.