Raj Thackeray । गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “असे करणे योग्य नाही पण…”

Raj Thackeray

Raj Thackeray । उल्हासनगरमधील गोळीबारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात जाऊन गोळीबार केल्याची घटना योग्य नसून, एका लोकप्रतिनिधीला एवढे कठोर पाऊल उचलण्यास कोणी भाग पाडले, याचाही तपास व्हायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले. एखाद्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात जाऊन असे पाऊल उचलले तर त्याच्या मानसिक स्थितीचा विचार करायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले.

Breaking News । ‘गरुडझेप’ कोचिंग सेंटरमधील धक्कादायक व्हिडीओ समोर; विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी टाकून काठीने आणि बेल्टने मारहाण

राज ठाकरे पुढे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याची न्यायालयात चौकशी करून सत्य बाहेर येईल. खरे तर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणमधील पोलीस ठाण्यात घुसून कल्याणचे माजी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Ajay Baraskar । अजय बारसकर यांचा सर्वात मोठा दावा

गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना उल्हासनगर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गणपत गायकवाड यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News । पिट्या भाईंनी समोर आणला पुण्यातील धक्कादायक व्हिडीओ; तरुण मुली नशेत…

Spread the love