Site icon e लोकहित | Marathi News

Raj Thackeray | राज ठाकरेंची भाजपच्या विरोधात प्रतिक्रिया; त्र्यंबकेश्वर, नोटबंदी यावरून केली जहाल टीका

Raj Thackeray | Raj Thackeray's reaction against BJP; Criticism will be made on Trimbakeshwar, demonetisation

राज्यात सध्या त्र्यंबकेश्वर (Tyambkeshwar) येथील घटना, २००० नोटेवर आलेली बंदी यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) चांगलेच ताशेरे ओढले आहेत. तसेच जनतेला गृहीत धरल्याने कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

पुन्हा बोल्ड स्टाईलमध्ये दिसली उर्फी जावेद, व्हिडिओ पाहून खाजवाल डोकं

त्र्यंबकेश्वर प्रकरणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले आहेत की, “त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे ती परंपरा सुरु आहे. तिला थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा जपत असलेली अनेक मंदिरे आहेत. दुसऱ्या कुठल्याही धर्माचा माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का? मी सुद्धा अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलो आहे.”

PUBG प्रेमींसाठी खुशखबर; पुन्हा चालू होणार BGMI, ‘हे’ आहेत नवे बदल…

मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेला म्हणालो होतो की, नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही. तज्ज्ञांना विचारून जर नोटबंदी झाली असती तर ही वेळ आलीच नसती. दोन हजार रुपयांच्या नोटा जेव्हा चलनात आल्या तेव्हा त्या एटीएममध्ये (ATM) भरल्या सुद्धा जात नव्हत्या, म्हणजेच त्याची साधी तपासणीही केली नव्हती. याचाच अर्थ होतो की यामागे कोणतही पूर्वनियोजन नव्हतं. असं सरकार चालत का ? असा प्रश्न नोटांबदी वर बोलताना राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Big Breaking | महाविकास आघाडी अजून मजबूत होणार! राज्यातील ‘हा’ महत्त्वाचा नेता मविआच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याची शक्यता

Spread the love
Exit mobile version