
मुंबई : मागच्या बऱ्याच दिवसांपासून भाजप-मनसे युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या युतीबद्दल खूप वेळा भाजपाला विचारले असता भाजपने युतीबाबबत कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पण आता यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वाक्यात या युतीबाबत उत्तर दिले आहे. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतली आहे.
राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीमुळे भाजप-मनसेच्या युतीबाबत अनेक तर्कवितर्क लागत आहेत. पण या चर्चांचं उत्तर राज ठाकरे यांनी एका वाक्यात दिलं. राज ठाकरे म्हणाले, “मी फक्त माध्यमामधूनच या चर्चा अथवा बातम्या ऐकत आहे”.
शेतकऱ्यांवर घाेणस अळीचा चावा, ‘एवढे’ शेतकरी रुग्णालयात दाखल
दरम्यान, सध्या राज्यातील राजकारणामध्ये अनेक वेगेवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यावर देखील राज ठाकरेंनी भाष्य केलं असून राजकारण्यांकडून जर अशा प्रकारे अपमान घडत असतील तर लोकांनी त्यांना अद्दल घडवणं गरजेचं असल्याचं असे ते म्हणाले.त्याचबरोबर जे चुका करत असतील आणि तरीपण लोक त्यांना मतदान करत असतील तर त्यांना अद्दल घडणार नाही असं देखील राज ठाकरेंनी वक्तव्य केलं आहे.
Sharad Pawar: “दसरा मेळाव्याचा एकनाथ शिंदेंनाही अधिकार,पण….”, शरद पवारांनी मेळाव्यावर व्यक्त केले मत